शिक्षकांची बदली थांबविण्यासाठी एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह दोघांना लाच स्वीकारतांना अटक

0

जळगाव ;- एरंडोलच्या शिक्षकांच्या बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारताना तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसर्‍या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्‍या एरंडोल शहरातील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६), मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय-४२), लिपिक नरेंद्र उत्तम वाघ(वय-४४) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अटक केल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांचा कारवाईत सहभाग

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, ईश्वर जाधव, सचिन चाटे, रवींद्र घुगे, सुनील पाटील, श्री.एस.के.बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.