प. पु. अक्षय ऋषीजी म. सा. यांचे सिल्लोड शहरात २८ जूनला आगमन

0

२ जुलै रोजी चत्तुर्मासला सुरुवात

तेजपाल जैन

फत्तेपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

आचार्य सम्राट पुज्या आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य खानदेश शिरोमणी उपप्रवर्तक तपमहर्षी प. पु. अक्षय ऋषीजी म. सा., यानाचा यवतमाळ शहरात मागील वर्षी शहरात होता . आता यावर्षी सिल्लोड शहरात चातुर्मास ला २ जुलै रोजी सुरुवात होत आहे. त्यांच्यासमवेत प्रखर ज्ञानी आणि मधुरभाषी प. पु. अमृत ऋषीजी म. सा., प. पु. गितार्थ ऋषीजी म. सा. आदि 3 संत सिल्लोड शहरात २८ जूनला प्रवेश करीत आहे. सिल्लोड जैन श्रावक संघ स्वागताची जय्यत तयारी करीत आहे. सिल्लोड चातुर्मास काळात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. २ जुलै चातृर्मास सुरुवात पासून ते चातुर्मास समाप्ती पर्यंत दररोज प्रवचन होणार आहे. तसेच निबंध स्पर्धा , धार्मिक कार्यक्रमावर आधारित वेगवेगळ्या अनेक स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे श्रावकांची धार्मिक भावना वाढीस लागेल. हा चातुर्मास एक आगळा वेगळआ कायम स्मरणात राहील असाच धार्मिक ठसा उमटविणार हे मात्र निश्चित .

 

Leave A Reply

Your email address will not be published.