पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बंधुशोक ; कैलास पाटील यांचे निधन

0

पाळधी/जळगाव ;- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघणार आहे.

कैलासजी यांच्या अकाली मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. तर ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी पाळधी येथे त्यांच्या निवास्थानी गर्दी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.