अरे देवा… जप्त केलेली दारू केली उंदरांनी फस्त, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्यप्रदेश मध्ये एक डोकं चक्रावणारी घटना घडली आहे. छिंदवाडा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी कारवाई करतांना जप्त केलेली दारू उंदरांनी फस्त केली. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलीस अधिकारी उमेश गोल्हारी यांनी याबाबत सांगितले की, विविध झालेल्या कारवाईत आम्ही जी दारू जप्त केली ती मालखान्यात ठेवण्यात आली आहे. जेव्हा आरोपींना कोर्टात सादर करायचे असते तेव्हा जप्त केलेली दारू किंवा ज्या वस्तू आम्ही जप्त करतो त्या देखील कोर्टात सादर कराव्या लागतात.

अशाच एका घटनेत जप्त केलेल्या दारूच्या ६० ते ६५ बॉटल उंदरांकडून कुरतडण्यात आल्या आहे. बॉटलला छिद्र पडल्याने त्यातून दारू गळत होती. उंदरांमुळे जवळपास ६० ते ६५ दारूच्या बाटल्यांमधून दारू वाया गेली आहे. या घटनेमुळे पोलिसांनी आता मालखान्याच्या साफसफाईचा निर्णय घेतला आहे.

पोलीस ठाण्यात उंदरांचा वावर वाढल्याने त्यांना पकडण्यासाठी पिंजरे देखील बसवण्यात आलेत. उंदरांनी अतापर्यंत पोलीस ठाण्यातील काही फाइल्स देखील कुरतडल्यात. या उंदरांमुळे कोतवाली पोलीस हैराण झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.