जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांच्याकडून चौपदरीकरणाची पाहणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम करतांना काही त्रुटी राहिल्या आहे. त्याच अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, मंगळवारी (ता.७) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी चौपदरीकरणाची पाहणी केली. पाहणी दरम्यान नवोदय विद्यालयासमोर सुशोभीकरण करणे, तसेच कुशल ऑफसेटजवळील अंडरपास पूर्ववत सुरू करणे, वांजोळा रोडजवळील अंडरपास सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना व नगरपालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निर्देश दिले आहेत.

त्यापुढे नाहाटा महाविद्यालय येथे सुशोबुकरां करणे, सुहास हॉटेलजवळ अंडरपास येथे मिरर लावणे व एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागा उपलब्ध करून वळण रस्ता बनविण्यात निर्देश देण्यात आले आहे. खडक चौफुली येथील वाहतूक रहदारीस अडथळा विषय मार्गी लावण्यास सांगितले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.