शेतकऱ्याचे २ लाख चोरटयांनी धूम स्टाईलने लांबवीले

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बस्थानकासमोरून पूजा शॉपी जवळून शेतकऱ्यांची दोन लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी धूम स्टाईलने लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमार घडली. तालुक्यातील पिंपरी पंचम येथील रहिवासी शेतकरी भगवान विश्वनाथ पाटील (वय ६५) यांनी बोदवड रोडवरील एचडीफसी बँकेतून शेतीसाठी २ लाख रुपये व त्यांच्याजवळील असलेले बंकेंचे पासबुक व चेकबुकसह स्कुटीने घराकडे निघाले होते. त्यावेळेची त्यांचा पाठलाग करत बोदवड करून येणाऱ्या दुचाकीवरील २ चोरटयांनी शेतकऱ्याजवळील दोन लाखांची रोकड लंपास करून चौकाकडे पळ काढला.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.