नामांकीत कंपनीचे सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई

0

जळगाव : नामांकीत सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या फुले मार्केटमधील तीन दुकानांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शहर पोलीस ठाण्यातील पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ९९ हजार ६९८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यातील बँगलोर येथील नयनतारा डेवीड डेमी यांची कंपनीने हिंदूस्थान यूनीलिव्हर कंपनीचे बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करुन त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. त्यांना मिळालेल्या माहिती नुसार जळगावात बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नयनतारा डेमी यांनी पोलीस अधीक्षकांना एक अर्ज दिला होता.

स्वामी यांच्यासह शहर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची भेट घेत त्यांना कारवाईबाबत माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, नामदेव पाटील, प्रियंका जोशी यांच्यासोबत पथक कारवाईसाठी

रवाना झाले. तीन्ही ठिकाणाच्या कारवाईतून ९९ हजारांचा मुद्देमाल जप्तत्यानंतर डेमी या त्यांचे सहकारी फरीदाबा

पथकाने फुले मार्केटमधील संतोष अरुण देवरे (वय ३६, रा. कांचननगर) यांच्या साई श्रद्धा नॉवेल्टी यांच्या दुकानात टाकला. दुसरी कारवाई जगदिश गुलाब नागदेव (सिंधी कॉलनी, बडा सेवा मंडळ, भुसावळ) यांच्या जय माँ अम्बे या दुकानात केली. त्यानंतर तिसरी कारवाई ही विशाल कमलकुमारढिंढवाणी२४, रा. कंवर नगर सिंधी कॉलनी) यांच्या न्यू कशीश फॅन्सी यांच्या दुकानात केली. याठिकाणाहून सुमारे ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाने कारवाईत जप्त केले बनावट सौंदर्य प्रसाधने सीलबंद केले. याप्रकरणी संशयित संतोष अरुण देवरे (वय ३६, रा. कांचननगर), जगदिश गुलाब नागदेव (सिंधी कॉलनी, बडा सेवा मंडळ, भुसावळ) व विशाल कमलकुमार ढिंढवाणी (वय २४, रा. कंवर नगर सिंधी कॉलनी) यांच्याविरुद्ध कंपनीसह ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.