जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड एका महिलेने विनयभंगाचे (Woman Molestation Case)  आरोप केले आहेत.  या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. या महिलेच्या दाव्यानुसार, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसरा गुन्हा दाखल

दरम्यान, ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ हा मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आव्हाड यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि भादंविच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.