“खडसेंच्या डोक्यात बिघाड..”, मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो. त्यातच सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते, या आरोपाने मोठी खळबळ उडाली होती. त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.

खडसेंच्या डोक्यात.. 

राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे प्रत्युत्तर देत म्हणाले की,  एकनाथ खडसेंच्या डोक्यात मानसिक बिघाड झाला आहे, यांना महसूल चोरीमुळे 137 कोटी रुपये भरावे लागणार आहेत, राजकीय अस्तित्व संपलं आहे आणि त्यांच्याकडे पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत.

चुकीचे आरोप 

तसेच महाजन म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वीचा फोटो दाखवून खडसे काय सांगतात? त्यावेळी कुंभमेळा होता, त्या निमित्ताने सर्व धर्मीय लोक उपस्थित होते. त्यावेळी मुस्लिम धर्मातील एका नेत्याच्या मुलाचे लग्न होतं. त्या लग्नाला 20 ते 25 हजार लोक हजर होते. त्या लग्नाला सर्व नेते उपस्थित होते. त्यावेळचा कुठलातरी फोटो दाखवायचा आणि काहीही आरोप करायचं काम सुरू आहे. या फोटोमध्ये आपल्यासोबत दाऊदचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आले होते. त्यानंतर याचे सर्व डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आणि आरोप चुकीचे असल्याचं स्पष्ट झालं होतं असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

चप्पलही घालायला पैसे

गिरीश महाजन म्हणाले की, कुठेतरी पोटात दुखतंय, 137 कोटी रुपयांचा दंड, भोसरी  एमआयडीसी जमीन प्रकरणी 27 कोटी दंड लागला आहे. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे आता यांच्या पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे खडसे बावचाळले आहेत. काही करून आपला सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला याचं दुःख त्यांना आहे. आपले सलीम कुत्तासोबत कोणतेही संबंध नसल्याचं सांगत गिरीश महाजन म्हणाले की, सलीम कुत्ता हा देशद्रोही आहे. त्यामुळे त्याच्यासोबत नाव जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे शिवसेना असून त्यांची अवस्था ही ना घर का ना घाट का अशी झाली आहे.

एकनाथ खडसेंनी काय आरोप केले?

वाचा सविस्तर 👇

 

महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध ?, खडसेंच्या आरोपाने खळबळ

Leave A Reply

Your email address will not be published.