महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध ?, खडसेंच्या आरोपाने खळबळ

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमी शाब्दिक वाद होत असतात. तसेच सध्या दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे घमासान सुरु आहे. सलीम कुत्ता याच्याशी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात दाखविले. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

त्यातच आता एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्ता याच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो विधान परिषदेत दाखवून खळबळ उडवून दिली. बडगुजर यांच्या एसआयटी चौकशी बरोबरच गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे, अशी मागणी खडसेंनी केली. त्यानंतर खडसेंच्या मागणीवर उत्तर देताना खडसे यांच्यावर आपण हक्कभंग आणणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान खडसेंच्या आरोपनंतर विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. खडसे यांनी आरोप मागे घ्यावेत, यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. त्यानंतर विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खडसे यांच्या आरोपावर उत्तर दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.