भुसावळात ५०० किलो गांजा पकडला !

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माथी अशी कि, भुसावळ शहरात बाहेर गावावरून एक वाहनामध्ये गांजा येत असल्याची गोपनीय माहिती एल.सी.बी.चे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली असता त्यांनी तत्काळ पथक भुसावळला रवाना करून जळगांव रोडवर सापळा लावण्यास सांगितले होते. गुरुवारी रात्री पथकाला १०.१५ वाजेच्या सुमारास जळगांव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली एक वाहन बरेच वेळ थांबलेल्या अवस्थेत दिसते. पथक पाहणी करण्यासाठी गेले असता वाहनात चालक नसल्याचे पथकाने अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पथक रात्रभर वाहनाजवळ लक्ष ठेवून होते. गुरुवारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी वाहन असलेल्या ठिकाणी दुपारी दोन वाजेला भेट दिली व वाहन भुसावळ तालुका पोलील स्टेशनला आणले.

पथकाने केलेल्या चौकशीत वाहनात वाहनांमध्ये गांज्याच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे असे चाळीस गठ्ठे एकूण ५०० किलो ६०० ग्रॅम असा ७५ लाख रुपयांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य मिळून आले. पथकाने दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनाच्या चालकाला स्थानिक गुन्हे शाखा पथकातील उपनिरीक्षक गणेश चौबे, कर्मचारी सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी, अक्रम शेख अशांनी मालेगाव येथून ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई

गांजा पकडण्याची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, अनिल जाधव, कलमाकर बागुल, अनिल देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, अमोल देवडे, अजीत जाधव, सुनील दामोदरे, ईश्वर पाटील अशांनी मिळून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.