प्रेरणादायी समर्पित जीवनयात्रा: स्व. श्रद्धेय आदरणीय पर्वताआई

0

दिव्यत्वाची जेथे प्रचीती |
तेथे कर माझे जुळती ||

असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणामूर्ती स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईंची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या दिवशी निसर्ग नियमाप्रमाणे, वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी झाली. पर्वताआईंच्या दु:खद निधनाने आदरणीय श्री. के. डी. आबा चौधरी, श्रीमती सुभद्राताई आणि त्यांच्या समस्त सोनवणे परिवाराचे मातृछत्र, कृपाछत्र हरपले सोनवणे परिवारातील एक सुवर्ण पान गळून पडले.

“अपनी करनी से वो कहानी बना लेते है,
जिंदगी एक अदभूत शान बना लेते है,
जिनके सिनेमे इमान भरा होता है ,
वतन पे मिटणे का वो अरमान बना लेते है ”

ही उक्ती पतीपारायण पर्वताआईंचे पती स्व. श्रद्धेय थोर स्वातंत्र्य सेनानी आदरणीय डूमन बाबांना तंतोतंत लागू पडते. पर्वताआई अत्यंत हुशार, सुस्वभावी, स्वावलंबी, काटक, कष्टाळू आणि सय्यमी, संसारदक्ष असल्यामुळे त्यांनी डूमन बाबांच्या प्रपंचाची बाजू उत्कृष्ठपणे सांभाळली. गांधीवादी विचारांनी भारावलेले आपले पती डूमन बाबांना त्यांनी सर्व प्रकारे व सर्वार्थाने घट्ट अतुतू साथ दिली. देशसेवा आणि समाज सेवेच्या त्या के. डी. आबा व डूमन बाबांच्या प्रेरणा स्त्रोत होत्या त्यांनी डूमन बाबांच्या देश सेवेच्या कार्यात स्वतः ला झोकून दिले होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढयानंतर १९४७ ते १९९३ पर्यंत बाबांच्या खाद्याला खांदा लावून खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या संसारात अन सर्व कार्यात रमल्या. पत्नी धर्माचा खरा अर्थ त्यांनी आपल्या संसारात दाखवून दिला.

पार्वती आई मातृत्व, कर्तुत्व, दातृत्व आणि संस्कारांची खान होती. संस्कारांची कस्तुरी, माया ममतेची तिजोरी आणि प्रेमाची गंगोत्री होती. तिच्या प्रेमाला अंत नाही, तिच्या उंचीचा दुसरा संत नाही. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कष्ट सुखाने सहन करून के.डी आबांना हे विश्व, ही दुनिया दाखवणारी पर्वता आई खरोखरच “आदर्श मातृशक्ती” होती. त्यागाचे, कष्टाचे, संकटाचा पहाड फोडणे संस्कार देवून जीवन कसे जगावे हे तिने आबांना शिकविले, तीचे पाय मातीचे होते तरी तिच्या पायी सर्व तीर्थ गोळा झालेली होती. पार्वती आई पवित्र मूर्ती असल्यानेच वंदनीय, पूजनीय स्मरणीय आणि अनुकरणीय, आचरणीय आहे.

कधी आपलं लेकरू के.डी आबांना आच न लागू देता स्वतः जळतांना पर्वता आई दिसे. कधी देव घरातल्या शांत तेवणाऱ्या समईसारखी वाटे कधी दुरडीतन अखंड सुरु असणारा हरिपाठ भासे. कधी जी सरतही नाही. उरतही नाही अशी अक्षय शिदोरी वाटे, कधी शिस्त लावणार शिस्तीच विद्यापीठ तर कधी लेकींना आतील गोष्ट सांगून मन मोकळे करायची हक्काची जागा वाटे. गोवऱ्या नि भाकरी एकाच भावनेनी थापणारी मायाळू कृपाळू अशी पर्वता आई होती. उन्हाची सावली व सुखाची नगर होती. होता पदर फाटका पन तरी खूप मोठी होती तिच्या मायेची सावली. निळ्या आभाळा येवढा पदर बनवून उन्हाची सावली होवून ती सर्वांना सुखच सुख अन आनंदच आनंद देत राहिली. के.डी आबांना बाल वयातच तीने देश व समाजसेवेचे बाळकडू पाजून एक कर्तृत्ववान सेवादायी देशभक्त व समाजभक्त बनवले. के.डी.आबा म्हणजे आपल्या सेवेच सुगंध पसरविणारं चंदन तर स्वयंभू तेजाने झळाळनारा हिरा आहे. मायेची सावली धरणारा वटवृक्ष आणि आपल्या अस्तित्वाला अमूल्य बनविणार सोन आहे. शुद्धतेच दुर्मिळ प्रतिक असलेला समाजाचे ऋण फेडणारा अनमोल मोती आहे. पर्वताआई आबांची फार मोठी शक्ती भक्ती होती. आबांचा पाठ टेकवायचा आधारवड आणि खडतर काळातला आधारस्तंभ होती. आईंच्या आशीर्वादानेच आबांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या सेवेचा उच्चांक गाठला आहे. कर्तुत्वाच्या श्रीमंतीची सर्वोच्च उंची आणि सर्व सदगुणांचा पाया असलेली विनम्रता आबांच्या ठायी आहे. देव भक्ती, कर्म भक्तीचा अनोखा संगम त्यांच्यात दिसून येतो. संतती, संपत्ती, सदाचार आणि समाधान या सदगुणांचा समुच्चय आबांच्या ठायी गुण्या गोविंदाने नांदत आहे. हे मात्र निर्विवाद ….!

पार्वता आईसाठी त्यांची नातवंड म्हणजे दुधावरची साय श्री. देवकांत, श्री. प्रा. सुर्यकांत, आणि प्रा. सौ. सोनल या आपल्या नातवंडावर प्रेमाची पाखर करीत त्यांचा उत्तम सांभाळ केला, त्यामुळेच नातू देवकांत, सुर्यकांत आणि नात सौ. सोनल हे पार्वती आईंच्या सुसंस्कारांची सुंदर प्रतीके आहेत. सासू सुनेचे नात अतिशय हळुवारपणे सांभाळत त्यांनी स्नुषा सौ. सरला वाहिनी, नातसुना सौ. धनश्री, सौ. प्रिया यांच्यावर अपार माया केली, पणतू दुष्यंत, प्रीतम आणि पणती कु. धनेश्वरी, कु पोर्णिमा हे जणू त्यांचे नेत्रच मुलगी सुभद्राबाई, नात अनिताबाई, भाऊजाई जयवंताबाई यांनी खूप सेवा केली.

आबांच्या सामाजिक कार्यात पार्वता आईचा सहभाग मेरू पर्वतासारखा अढळ राहिला. ‘सेवा परमो धर्म ’ हा उदात्त हेतू काय असतो हे त्यांनी आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिला. पार्वता आई शतायुषी व्हावेत अशीच आबांची व प्रत्येकाची मनोमन ईच्छा होती. परंतु ते घडले नाही. त्याच जगन सर्वांसाठी आदर्श होत. आणि आता त्याचं नसन हे क्लेशदायक असणार आहे. परंतु त्या दु:खाला सर्वांना स्वीकारावेच लागेल संत श्री. संताजी महाराज त्यांच्या विचार कार्याला आसमंतामध्ये सदैव तेवत ठेवो हीच प्रत्येक संताजी भक्तांची आंतरिक इच्छा आहे. वात्सल्याची, माया ममतेची पार्वताआई हि दिव्यमूर्ती आठवणींच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात अमर आहेत. हे मात्र नक्की …!

काय वानू आता न पुरी वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ।।
तुझ्या वंदितो माऊली पावलास …..

– टी.एम चौधरी
निवृत्त मुख्याध्यापक
प्र.वि.मंदिर चोपडा

Leave A Reply

Your email address will not be published.