शेती आणि शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध राहू हाच आमचा संकल्प

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेती आणि शेतकरी यांचे हित जोपासण्यासाठी जैन उद्योग समूहाचे समूह सातत्याने कार्यरत असून ते आमच्या रक्तात भिनले आहे. वाढदिवस ही एक औपचारिकता असून प्रत्येक उगवणारा दिवस माझ्यासाठी नवा संकल्प घेऊन येतो. अशी भावना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी काल त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त बोलताना व्यक्त केली.

अशोक भाऊ जैन यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त काल दुपारी दोन वाजेपासून जैन हिल्सवर त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. जैन हिल्स येथील प्रसन्न हिरवळीच्या वातावरणात अशोक भाऊ जैन यांना अनेक जण शुभेच्छा देत होते. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये सर्व स्तरातील सहकाऱ्यांचा समावेश होता. विशेषतः शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक जण, विद्यार्थी वर्ग, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक भाऊंचा 61 वा वाढदिवस म्हणून मुस्लिम समाजातील 61 बांधवांनी एकत्रितपणे येऊन त्यांना सामूहिकपणे शुभेच्छा दिल्या. त्यांच्या 61 वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. अशोक भाऊंनी याप्रसंगी दैनिक लोकशाही बोलतांना म्हणाले, वाढदिवस साजरा करण्याची प्रथा जैन उद्योग समूहाचे संस्थापक कै. भवरलालजी जैन उर्फ मोठे भाऊ यांना मान्य नव्हती. हीच परंपरा आम्ही पाळली. परंतु जीवनातील 61 वी हा टप्पा महत्त्वाचा असल्याने चहात्यांचा हिरमोड होऊ नये, म्हणून त्यांच्या शुभेच्छांची शिदोरी घेऊन आगामी वाटचाल करतो आहोत, असे मत भाऊंनी व्यक्त केले.

61 वाढदिवसानिमित्त काल सकाळी जैन हिल्स येथे असलेल्या गोशाळेत जाऊन शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप अशोक भाऊंच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर त्यांच्या चाहत्यांकडून अशोक भाऊंची वृक्षतुला आणि ग्रंथतुला करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.