काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

या दिवशी करणार प्रवेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला दुसरा झटका बसणार आहे. जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ.केतकी पाटील हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून त्यांना या प्रवेशामुळे भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान भाजप प्रवेशाबाबत डॉ. पाटील म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. या विकासयुगाच्या वाटचालीत आपणही सहभागी व्हावे म्हणून आपण कन्या डॉ केतकी पाटीलसह भाजपत प्रवेश करीत आहोत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.