गाढ झोपेचा फायदा; जबरी घरफोडी करून लाखोंचे दागिने लांबवले

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी भागात जबरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आलीय. कुटूंब गाढ झोपे असताना चोरट्यांनी बेडरूमच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल सात लाख 21 हजारांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश एकनाथ तावडे (40, रा.स्टेट बँक कॉलनी, भडगाव रौड. पाचोरा) हे शुक्रवारी रात्री  12 वाजता झोपल्यानंतर चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापले व घरात प्रवेश करीत कपाटातील सात लाख 21 हजार रुपये किंमतीचे व 23 तोळे व आठ ग्रॅम वजनाचे दागिणे व सात हजारांची रोकड लांबवली.

दरम्यान सदर प्रकार शुक्रवार 19 रोजी रात्री घडला असून शनिवारी सकाळी सात वाजता तावडे यांच्या पत्नीला बेडरूमचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे, प्रभारी निरीक्षक किरण शिंदे व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.