मारुतीच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष करत असताना दुःखद घटना घडली आहे.  बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनाहून येतांना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मन्यारखेडा फाटाजवळ घडली. नेहाल राजेश माछरे (वय १८, रा. कंजरवाडा, जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल माछरे हा आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्याला आहे. तो एका फोटो स्टुडिओत् तो कामाला होता. तसेच शिक्षणही करत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.

सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. तर जखमी अक्षय माछरे व उन्नती तमायचेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मयत नेहालच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी करत मोठा आक्रोश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.