चिंताजनक : सैफ अली खान रुग्णालयात दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

बॉलीवूडमधून चिंताजनक बातमी आली आहे. अभिनेता सैफ अली खानला  रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्यासोबत पत्नी करीना कपूर देखील हजर असून सैफला ही दुखापत नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

सैफ अली खान सध्या साऊथ चित्रपट देवरामध्ये काम करत आहे. यामध्ये तो बहिराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरही आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान जखमी झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेबाबत कोकिलाबेन हॉस्पिटलकडून आतापर्यंत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. तसेच सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या दुखापतीबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.