बकालेंना मदत करणे भोवले, दोन पोलिसांची बदली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंना मदत करणाऱ्या दोन पोलिसांना चांगलेच भोवले आहे.  बकालेंना मोबाइल वापराची सुविधा देणारे ड्यूटीवरील गार्ड आणि जिल्हापेठचे पोलिस कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील यांची पोलिस अधीक्षकांनी पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बकाले यांनी  मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले होते. तीन वेळा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही हजर झाले नाही. त्यानंतर मालमत्ता जप्तीच्या भितीने बकाले स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाले होते.

दरम्यान  न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत असताना बकाले यांना मोबाइल फोन व इअर बडचा वापर करू दिल्याचे फोटो प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. या प्रकरणाची पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.