राज्यात चाललंय तरी काय? आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; गोळी मारणाऱ्याने स्वतःलाही घातली गोळी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळ्यांची मुक्तपणे उधळण होतांना दिसत आहे. उल्हासनगर मधील प्रकरण ताजे असतांनाच दहिसर येथेही अश्याच एका घटनेची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आहे. दरम्यान या घटनेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मॉरिश नावाच्या व्यक्तीने हल्ला केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

राज्यात गुंडांचं सरकार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्यांच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंड्याचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.

मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.