राज्याचे अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होणार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सध्या राज्यात अर्थसंकल्पाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्याच्या पूर्वतयारीच्या कामाला वेग आला असून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी सन २०२४ -२५ चा अंतरिम अर्थसंकल्प (maharashtra budget 2024-25)सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे.

दरम्यान मात्र यावेळी अधिवेशन अर्थसंकल्पाच्या व्यतिरिक्तही तापेल असे चित्र आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासह भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरण यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.