भरदिवसा जळगावात मुख्य चौकात निघाले पिस्तूल !

0

जळगाव ;-शहरातील मुख्य चौक असलेला स्वातंत्र्यविर चौकातील हॉटेल रूपाली समोर दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले. झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला आहे. यावेळी शहर वाहतूक पोलीसांच्या लक्षात आल्याने त्यांनी चौघांसह दोन वाहने,व गावठी पिस्तूल जप्त केले असून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हेगारी जिल्हाभरात बोकाळल्याने नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जळगाव शहरातील स्वातंत्र्यविर चौकात कार क्रमांक (एमएच १८ बीआर ९००९) आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईसी ६७२८) वर बसलेले दोन गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ सोनू गणेश चौधरी, चेतन उर्फ भैय्या रमेश सुशीर आणि अतुल कृष्ण शिंदे हे अट्टल गुन्हेगार दोन गटात एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही वाहने थांबवून त्यांनी वाद निर्माण झाला. यातील एकाने गावठी कट्टा काढून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेवून वाद मिटवत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहने घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान हा वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समोर आलेले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.