जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची छुपी युती; एकनाथराव खडसेंचा आरोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खूप टीका टिपण्णी होतांना दिसत आहे. आता या राणा दाम्पत्यावर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी टीका केली आहे.

आधी आपली ताकत निर्माण करा

एकनाथराव खडसे हे नवनीत राणांना आव्हान देत म्हणाले की, तुम्ही आता ज्या निवडून आल्या आहेत, ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टेकूमुळे निवडून आलात. तुमच्‍या ताकदीवर नाही. आधी आपली ताकत निर्माण करा. नंतरच मुख्यमंत्र्यांसमोर लढण्याची हिम्मत करा.

जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची छुपी युती

तसेच ते म्हणाले की, जळगावमध्ये येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.