मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क
येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे दुपारी एक वाजेच्या सूमारास शाँटसर्कीटने शेतात आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
थोरगव्हाण येथील गट. नं.३५४ या शेतात यादव छन्नू चौधरी यांचा शेतात मकाची कडबा कुट्टी तयार करुन ठेवली होती. त्या ठिकाणी विजेच्या तार तुटल्याने अचानक आग लागली.
या आगीत कुट्टीची पुर्णपणे राख झाली तर गोपाल चौधरी यांच्या शेतात असलेल्या केळी पिकात पुन्हा तार तुटल्याने केळी बागेत सुकलेली पत्तीने रुद्रअवतार घेतल्याने ठिबकच्या नळ्या जळून खाक झाल्या असून ग्रामस्थकडुन आग विझविण्यात आली आली.
या शाँटसर्कीटने लागलेल्या आगीने एक ते दिड लाख रुपयापर्यत नुकसान झाले असून अद्यापही पंचनामा झाला नसल्याचे सांगण्यात आले.