वापरून फेकून द्यायची भाजपची रणनीती – खडसेंचा हल्लाबोल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज जळगावमध्ये शरद पवारांची सभा सुरु असतांना अनेकांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केलीय. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हल्लाबोल केले. ‘ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्या पक्षाला भ्रष्टाचारी म्हटले, अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना मंत्रिमंडळात का घेतले?, ‘ असा सवाल खडसे यांनी केला. वापरा आणि फेकून द्या, ही भाजपची रणनिती आहे. दादा तुम्हाला येथे किती सन्मान होता. यहा तो शेर थे, तुमच्या फाईल घेऊन फडणवीसांकडे जावे लागत असेल तर मग तुमचा स्वाभीमान गेला कुठेय? असेही खडसे यांनी म्हटले.

 

दोन बायका आणि फजिती ऐका

ओबीसींना आरक्षण दिले नाही तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असा घोषणा करणारा भाजप नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. पण प्रत्यक्षात असे झालेच नाही. हा माणूस खोटारडा आहे, अनेक वल्गना करणारा हा नेता सातत्याने खोटे बोलतो. सद्या देखील मराठा समाजााला मुर्ख बनवण्याचे काम हे सरकार करत आहे.  आजच्या सरकारची परिस्थिती ही दोन बायका आणि फजिती ऐका अशी झालेली आहे. कोण कोणाला काही समजत नाही. सरकारमध्ये समन्वय उरलेला नाही.

 

तोंडी आदेशावर काम 

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली ही चांगली गोष्ट आहे. तीन दिवस आधी माफी मागितली असती, तर तीव्रता कमी झाली असती. कोणात्याही मोठ्या घटना ज्यावेळी घडतात, त्यावेळी लेखी आदेश असतोच असं नाही. तोंडी आदेशावर सुद्धा काम कराव लागतं. लाठीचार्ज करायचा आदेश वरिष्ठांकडून आला, हा वरिष्ठ कोण असू शकतो? एखादी घटना घडली की, अंतिम जबाबदारी गृहखात्यावर मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला की, रेल्वे मंत्री राजीनामा देतो. लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही, असं म्हणणं चुकीच ठरेल असं खडसे म्हणाले.

 

जळगाव जिल्हा तर वाऱ्यावर

सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झालीय.  दहा तास तरी वीज मिळते का, शेतकऱ्याला तीन तास देखील वीज मिळत नाही. महागाई वाढली, गॅस सिलिंडर किंमती कमी केले निवडणूक आली म्हणून हे उपक्रम सुरू आहे. इतकंच काय तर  जळगाव जिल्हा तर वाऱ्यावर सोडला आहे. असे एकनाथराव खडसे म्हणाले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.