जळगावात भाजपला झटका, ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावमध्ये आज शरद पवारांची भव्य स्वाभिमानी सभा होत आहे. जळगावात मोठं खिंडार पडले असून शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.  जळगाव जिल्ह्यात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भाजप नेता बी एस पाटील यांनी  आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यासह आणखी काही जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच वाढलेली दिसत आहे.

कोण आहेत बी एस पाटील

बी एस पाटील हे खान्देशातील मोठं नाव आहे. ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपात परतले होते. त्यानंतर बी एस पाटील हे 2019 मध्ये चर्चेत आले होते. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात वाद झाला होता. अमळनेरला एका जाहीर कार्यक्रमात उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली होती. विशेष म्हणजे यावेळी मंचावर मंत्री गिरीश महाजन हे देखील होते. आता बी एस पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.