नशिराबाद येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दवी अंत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नशिराबाद नगरपंचायतीत काम करणाऱ्या साफसफाई कर्मचारी तरुण हा गटारीचे काम करतांना विजेच्या वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी साक्ली ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल गोपी चिरावंडे (वय-२६) रा. नशिराबात ता. जि. जळगाव असे मयत नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विशाल गोपी चिरावंडे हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद गावाजवळील शेताजवळ गटारीचे काम करत करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्याला उचलून खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकाच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.