धुळ्याजवळील लळिंग घाटात चार वाहनांचा अपघात, वाचा सविस्तर

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग (Lalling) घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश आहे. सुदैवाने टँकरलाल गळती लागलेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. कंटेनर आणि मालमोटार या दोन वाहनांचा अपघात झाल्याने घाटात वाहतूक खोळंबली असतांना उभ्या असलेल्या टँकरला मागून दुसऱ्या वाहनाने धडक दिली. त्यात इतर काही वनांचेही नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलास तसेच आपत्कालीन विभागाला बोलविण्यात आले. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लळिंग घाटात सातत्याने अपघातांची मालिका सुरूच असते.

Leave A Reply

Your email address will not be published.