पतीने ऑनलाईन चॅटिंग करू न दिल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पत्नी परक्या माणसाशी ऑनलाइन चॅटिंग करत होती. पतीला ते आवडले नाही आणि त्याने विरोध केलं असता त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याचाच राग डोक्यात घेऊन पत्नीने तोकाच पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. बातमीला आत्महत्या करण्यास उकसवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय इसमाला, त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यास उकसवल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीने राहत्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

महिलेने इमारतीतून उडी मारून दिला जीव
सूत्रानुसार, डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकरण घडला असून याप्रकरणी करण सोळंकी याला अटक करण्यात आली. त्याची पत्नी पूजा सोळंकी हिने १ सप्टेंबर रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

ऑनलाइन चॅटिंग करणारा इसम अटकेत
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी पतीने त्याच्या पत्नीच्या ऑनलाइन चॅटिंगवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या आई-वडिलांनी तिचा पती तसेच ती ज्याच्याशी ऑनलाइन चॅट करत होती , त्या दोघांचेही नाव घेत, त्यामनीच मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप केला होता. पोलिसांकडे तक्रार करत त्या दोघांचीही नावे त्यांनी घेतली होती. त्याच आधारे पोलिसांनी मृत महिलेश ऑनलाइन चॅटिंग करणारा इसम गोपाश, यालाही अटक केली. गोपाळ याने मृत महिलेला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून त्रास दिला होता, असा आरोप तिच्या पालकांनी लावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.