सिंधी कॉलनीमध्ये प्रौढाची दुचाकी लंपास

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील सुनील ऑइल मिल जवळील सिंधी कॉलनी परिसरातून एका जणाची ८० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, निलेश कडू वानखेडे (वय ४३) रा. हनुमान नगर गणेशपुरी, भुसावळ. हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. निलेश वानखेडे यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ झेड ४२९३) ही शहरातील सुनील ऑइल मिल येथे लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ८० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरली. हा सर्व प्रकार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दुचाकी चोरी झाली, हे लक्षात आल्यानंतर निलेश वानखेडे यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कुठेही दुचाकी सापडली नाही. अखेर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक भूषण जैतकर करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.