एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ; फडणवीसांची मोठी खेळी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही  घोषणा केली. एकनाथ शिंदे आज एकटे संध्याकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना भाजप पूर्ण पाठींबा देणार आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करणार,असेही फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईतल्या राजभवनावरील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

– हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी युती केली व भाजपला बाहेर ठेवले, हा अपमान होता.

– जनतेने भाजप- सेनेला बहुमत दिले होते.

– गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने प्रचंड भ्रष्टाचार केला.

– दोन मंत्री जेलमध्ये जाणं अत्यंत खेदजनक.

– दाऊदशी संबंधित नेत्याला जेलमध्ये गेल्यानंतर मंत्रीपदावरून हटवले नाही.

– एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते आहेत.

– ही लढाई तत्वांची, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे.

तसेच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पत्रकारांच्या एकही प्रश्नाला उत्तर न देता निघून गेल्या.

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

– महाविकास आघाडीत खूप मर्यादा होत्या.

– आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार

– एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देणार

– फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

– ठाकरे सरकारने घेतलेल्या औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

– मला मुख्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार.

– बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठींबा देणे हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे.

– मुख्यमंत्री फडणवीस होऊ शकत होते, मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला संधी दिली.

– फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा नेता पाहिला नाही.

अपडेट वृत्त लवकरच.. जुळून राहा लोकशाहीशी

Leave A Reply

Your email address will not be published.