Wednesday, February 1, 2023

अमळनेरमधील दगडी दरवाज्याचा बुरुज कोसळला; दोन कामगार जखमी

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पुरातत्व स्थळाचा दगडी दरवाजा आज पुन्हा कोसळल्याने दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून दगडी दरवाजाचे काम कासवगतीने सुरू आहे. हेच काम सुरू असताना अचानक आज एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला आहे. दरम्यान सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नसली तरी संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभाग मोठी दुर्दैवी घटना होण्याची वाट तर पाहत नाहीये ना ? असा संतप्त सवाल आज अमळनेरकर या घटनेनंतर करीत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात, काम चुकारपणा व थुंकी लावून हे काम होत असल्याचा आरोप देखील यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे