Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिंदेसेनेच्या किती जणांना ‘त्याग’ करावा लागणार?
    महाराष्ट्र

    शिंदेसेनेच्या किती जणांना ‘त्याग’ करावा लागणार?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 21, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकोत्सव विशेष लेख 

    शिवसैनिकांनी नेहमीच युती धर्म पाळला असून तोच पायंडा यंदाही कायम राहणार असून त्यागाची तयारी ठेवावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिल्यात.

    महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तीन पक्ष असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. केंद्रीय अमित शहा दोन आठवड्यांपूर्वी राज्यात येऊन गेले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. त्यांनी भाजप नेतृत्त्वाची भेट घेतली. पण त्यानंतरही जागावाटपचा पेच कायम आहे. त्यातच आता मनसेच्या रुपात चौथ्या भिडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा आणखी किचकट होऊ शकतो.

    राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत असताना दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी शिंदेंनी खासदारांसोबत चर्चा करत प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा. उमेदवार कोणताही असला तरीही महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले असताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. माझ्या 13 खासदारांची तिकिट कापून नका. विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा, अशी विनंती शिंदेंनी शहांकडे केली. त्यातच आता शिंदेंनी त्यांच्या खासदारांना त्यागाची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या खासदारांची धाकधूक वाढली आहे.

    काय म्हणाले एकनाथ शिंदे?

    लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन महायुतीत कोणताही दुरावा नाही. जागावाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, असे शिंदेंनी त्यांच्या खासदारांना सांगितले. ‘जागा वाटपापेक्षा देशात एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून 45 जागा कशा निवडून येतील हे पाहू, तेच महत्त्वाचे आहे,’ असे शिंदेंनी खासदारांना सांगितल्याचे राहुल शेवाळेंनी सांगितले.

    #maharashtra Eknath shinde Political Shinde sena
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif