सावधान: अंड्यासोबत ‘हे’ पदार्थ खाताय ? तयार होईल विष..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अंडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याने अंड्याला  सुपरफूड म्हटले जाते. लोकांना सकाळी उकडलेली अंडी खायला आवडतात, तर काहींना ऑम्लेट बनवून खातात. मात्र असे काही पदार्थ आहेत जे अंड्यांसोबत खाऊ नयेत. अंडे खाल्ल्यानंतर किंवा अंड्यासोबत खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चला तर जाणून घेऊया अधिक माहिती..

लिंबू खाऊ नका

काहींना लिंबू फार आवडतो. तसेच गरम मसाला आणि मीठ घालून खाण्याची अनेकांना सवय असते तर काही लोक त्यात लिंबू पिळून खातात. जर तुम्हालाही ही सवय असेल तर आजच ती सोडणे योग्य ठरेल. लिंबू अंड्यासोबत खाल्ल्यास त्याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

चीज खाऊ नका 

उकडलेल्या अंड्यांसोबत चीज खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, कारण दोन्ही अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. जास्त प्रोटीनमुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उकडलेल्या अंड्यांसह चीज न खाणे चांगले.

केळीसोबत खाऊ नका

अंड्यासोबत केळी खाणे टाळा. अंडी खाल्ल्यानंतर केळी खाणे चांगले नाही. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि आतड्यांसंबंधी समस्या होऊ शकतात.

दूध पिऊ नका

अंडी खाल्ल्यानंतर दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचनाच्या समस्या आणि उलट्या होऊ शकतात. त्याचप्रमाणे बरेच लोक अंडी खाल्ल्यानंतर चहा देखील पितात, परंतु दोन्ही एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

मांस खाणे टाळा

काही लोकांना अंडी घालून शिजवलेले मांस खायला आवडते. या दोन्हीमध्ये प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. या कारणास्तव हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आळस होण्याची समस्या उद्भवते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.