भयंकर.. झोपेत असताना कात्रीने केला वडिलांचा खून

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पोटच्या मुलाने वडिलांचा कात्रीच्या सहाय्याने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे.  वडिलांवर कात्रीने वार करत असताना मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र मुलाने तिच्यावरही हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे.

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) आरोपी मुलाचे नाव असून याला पोलिसांनी अटक केली असून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवनाथ काहीच काम करत नसल्यामुळे वडिलांनी त्याला काम कर असं सांगितलं होतं. काम कर, चांगले रहा, असे त्याचे वडील त्याला वारंवार सांगत होते. मात्र काम न करता मध्यरात्री दीडच्या सुमारास मुलाने गाढ झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्री घेऊन त्यांच्या छाती आणि पोटावर सपासप वार करत त्यांचा निर्घृण खून केला. यावेळी आईने मध्यस्ती करत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आईवरही हल्ला चढवत तिलाही गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली असून विश्रांतवाडी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.