महिलेला लग्नाचे आमिष देत अत्याचार, गुन्हा दाखल

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

३० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह राहते. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथे राहणार दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (वय ३०) या तरुणाने महिलेला लग्नाची आमिष दाखविले, त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिचा विश्वासघात केला. दारू पिऊन तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचे देखील समोर आले आहे.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार यांच्या विरोधात पहूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.