आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल, मराठा समाज आक्रमक

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा समाज भूषण मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे विरुद्ध तसेच मराठा समाजाची बदनामी होईल अशी आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याबाबत मराठा समाज बांधवांकडून मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. वरील विषयास अनुसरून असे निवेदन देण्यात आले की, मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मराठा समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आ. चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे सुमारे 2.20 कोटी तर बोदवड येथे सुमारे 70 लक्ष अशा भरीव निधीसह सामाजिक सभागृह मंजूर करून आणले. त्यामुळे भविष्यात मराठा समाजातील गोरगरीब कुटुंबातील लग्न सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी खूप मोठी सुविधा होणार असून आमदारांनी केलेल्या या कार्याचे कौतुक म्हणून मराठा समाजातील 13 विविध संघटना, सामाजिक संस्थांच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुक्ताईनगर येथे एकाच मंचावर येऊन मराठा समाजातर्फे घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याविषयी पोटशुड उठलेल्या विजय पाटील नामक बोदवड तालुक्यातील समाजकंटकांनी गेल्या दोन दिवसापासून आमदार पाटील यांची तसेच या सत्कार सोहळ्याविषयी आक्षेपार्ह व शिवराळ भाषेत तसेच मराठा समाजातील दोन गटात तेढ निर्माण होईल अशा संतापजनक पोस्ट सोशल मीडियावर केले.

सदर समाजकंटकाच्या वादग्रस्त सोशल मीडियातील पोस्ट कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा समाजकंटकावर तात्काळ गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठा समाजातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन मुक्ताईनगर तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी, आनंदराव देशमुख, दिलीप पाटील, राजेश ढोले, वाय.डी.पाटील, प्रफुल्ल पाटील, जितेंद्र मुर्हे, शिवराज पाटील, कृष्णा पाटील, गजानन पाटील, राजू बंगाळे, प्रदीप कोल्हे, उमेश पाटील, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत मराठे, गणेश पाटील, कृष्णा बंगाळे, रोशन पाटील, वैभव कोल्हे व आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.