चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये 3,162, दिल्लीत 1,797, हरियाणामध्ये 689 आणि कर्नाटकमध्ये  634 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात एकूण 5,19,903 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 79.05% नवीन प्रकरणे फक्त या पाच राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रातच 31.51 टक्के प्रकरणे आढळून आली आहेत. गेल्या 24 तासांत देशात 23 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. एकूण मृतांची संख्या 5,24,840 झाली आहे.

देशातील पुनर्प्राप्ती दर 98.63% राहिला ही दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासांत एकूण ८,१४८ रुग्ण बरे झाले आहे. देशभरातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,26,90,845 झाली आहे. भारतात एकूण 68,108 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत 5,045 सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,99,824 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 1,96,00,42,768 लोकांना कोव्हिड लसीकरण मिळाले आहे.

याआधी शुक्रवारी देशात कोरोनाचे 12847 रुग्ण आढळले होते. तर 14 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तो गुरुवारच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी जास्त होता. सर्वाधिक 4,255 प्रकरणांसह महाराष्ट्र या यादीत अव्वल आहे. यानंतर केरळमध्ये 3,419 दिल्लीत 1,323 कर्नाटकात 833 आणि हरियाणामध्ये 625 प्रकरणे नोंदवली गेली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.