अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याची छापेमारी

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याच्या पथकाने मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात करून कागदपत्रे जप्त केले. सहकार खात्याच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात छापेमारी केली.

अवैध सावकारी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.  शुक्रवारी सकाळी साडेनऊपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत सदर पथकाने काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.  या कारवाई अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील संदीपकुमार शामसुंदर खंडेलवाल, राजकुमार रामकुमार खंडेलवाल, बळीराम चांगो महाजन, प्रतीक रामनिवास खंडेलवाल, आणि हरी किसन भोई व सालबर्डी येथील प्रदीप बढे यांच्याकडे झाडाझडती घेण्यात आली. तर बोदवड येथील वसंत खाचणे आणि कैलास गोपीचंद अहुजा यांच्याकडेही सहकार खात्याच्या पथकाने कसून तपासणी केली.

या पथकात सहकार खात्याचे अधिकारी यांचा समावेश होता. यामध्ये चोपडा एस. एफ. गायकवाड, जामनेरचे जे. बी. बारी, अमळनेर येथील पी. पाटील, एरंडोल येथील पाटील, मुक्ताईनगर मंगेश कुमार शहा, वडगाव येथील महेश कासार, चाळीसगाव येथील चंद्रकांत पवार आणि पाचोरा येथील एन. के. सूर्यवंशी या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या छापेमारीतुन महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे हाती लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.