काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे.

मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora), वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) व अमिन पटेल (Amin Patel) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपुर्वी काँग्रेस नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, मतदार संघातील विकास कामांबाबत त्यांची भेट घेऊन चर्चा केली, यातून राजकीय अर्थ काढू नये, असे तिघांनीही सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.