भाऊ खरंच मॉर्निंगवॉक करतो ? की अंधाऱ्यात दार ठोकतो

0

भडगाव (सागर महाजन) लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या कुठल्या न कुठल्या त्रासामुळे अनेक जण पहाटे मॉर्निंग वॉकचा सल्ला देतात. परंतु खरंच ज्यांना मॉर्निंग वॉकला जायचे आहे. ते प्रामाणिकपणे आपली वेदना कमी होण्यासाठी व हेल्दी राहण्यासाठी मॉर्निंग वॉक करतात. परंतु मॉर्निंग वॉकच्या नावाने अनेक महाभाग दरवाजा ठोठावता व आपल्याला कुणी पाहू नये यासाठी गुपचूप आपला खेळ करून पसार होतात.

तसेच रात्री वाळू तस्करांचे पंटर हे नाईट राऊंडला गस्त घालणारे पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी वर्गावर जागता पहारा देत आपले सूत्र भ्रमणध्वनी द्वारे हलवतात.  यामुळे खरंच मॉर्निंग वॉकसाठी फिरतात की? वाळू चोरांच्या खबरी की अज्ञात चोर हेच लक्षात येत नसून अशांवर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पडताळणी करून कारवाई करावी.

रात्री होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांची आपली दुचाकी चारचाकी वाहने घरासमोरून गायब होतात. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवावी. रात्रीच्या वेळी उपद्रवी आहे ? वाळू माफियांचा खबरी आहे? की खरे चोर यांना आळा बसावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.