Wednesday, February 1, 2023

यावल विरावली रस्त्यावर रिक्षा अपघात; एक ठार, दोन जखमी

- Advertisement -

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील वीरावली ते यावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम. एच. १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षाने प्रवास करित असताना वीरवली ते यावल दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडून पलटी होवून जखमींना उपचारासाठी यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

सेवानिवृत्त शिक्षण विभाग अधीक्षक दस्तगीर सबाज तडवी रा. विरवली  ह. मु.  जळगाव  यांना जबर मार लागल्याने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय   रूग्णालयात उपचारासाठी दाखल करीत असताना रस्त्यातच त्यांची  प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

मात्र सदर गुन्ह्याची ऑटो रिक्षा जागेवरून पसार झाल्याने मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मृत्यू संदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.  सदर प्रकरणी चौकशी होवून रिक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. मयत दस्तगीर सबाज तडवी हे हिंगोली जिल्हा  RTO आशिफ तडवी यांचे वडिल होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे