रिपेअरिंगसाठी गॅरेजवर आलेल्या ३ लक्झरी बसमधून चोरटयांनी साहित्य चोरले

0

जळगाव ;- येथील व्ही सेक्टर येथे असणाऱ्या गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या लक्झरी बसमधून ४८ हजार रुपयांच्या बॅटर्या व इतर साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ ते १६ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , एमआयडीसी मधील व्ही सेक्टर येथे धनराज बलदेव परदेशी वय ४९० यांचे गॅरेज असून त्यांच्या गॅरेजमध्ये बसबॉडी रिपेअरिंग साठी बसवाँडी रिपेरींग गॅरेजमध्ये रिपेरींगकामी आलेल्या लक्झरी बसेस क्र.एमएच ०२ -इआर ४१८२२ , एमएच ०२ इआर ४६३५३ आणि एमएच १६- ९९८६ मधून,१५,हजार किमतीचे मायक्रोटेक कंपनीचे इन्व्हर्टर ३ नग, १५हजार रुपये कि.चे आहुजा कंपनीचे एम्प्लीफायर ३, १८,हजार रुपये किमतीचे
एक्साईड कंपनीच्या ६ बॅटऱ्या असा एकूण ४८ हजार रुपयांचे साहित्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना मुदस्सर काझी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.