धक्कादायक; नवी मुंबईत पार्किंगच्या वादातून तुफान राडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमध्ये कार पार्क कुठे करायची?असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरून भांडणे वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहे. नवी मुंबईमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईतील नेरुळ परिसरात पार्किंगच्या वादातून तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. नेरुळ परिसरात एकाच सेक्टरमध्ये मात्र वेगळ्या इमारतीमध्ये राहणारे दोन व्यक्ती विठ्ठल राक्षे आणि मंगेश साळगावकर यांच्यात हा वाद झाला.

विठ्ठल राक्षे काही कामानिमित्त मंगेश मुळगावकर यांच्या इमारती समोर गेले असता, त्यांनी आपली गाडी मंगेश मुळगावकर यांच्या इमारतीच्या गेट समोर उभी केली. यावेळी कामानिमित्त मंगेश मुळगावकर यांनी राक्षे यांना विचारणा केली असता दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी मुळगावकर यांनी राक्षे यांना जबर मारहाण केली.

यादरम्यान मुळगावकर यांनी चक्क आपला पाळीव कुत्रा राक्षे यांच्या अंगावर सोडला. यावेळी कुत्र्याने राक्षे यांच्या हाताला चावा घेऊन त्यांना जखमी केले. याप्रकरणी मंगेश मुळगावकर आणि त्यांचा मुलगा सौमिल मुळगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.