जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन : सेक्युरिटी, प्रायवसी व अॅप्लिकेशन‘या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत ब्लॉकचेन: सेक्युरिटी म्हणजे काय, ब्लॉक चेन नेटवर्क, पब्लिक ब्लॉक चेन, प्रायव्हेट ब्लॉक चेन, कंसोर्टियम ब्लॉकचेन आणि हायब्रीड ब्लॉक चेन असे विविध मुद्दे, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान हैदराबाद येथील डॉ. अशोककुमार दास यांनी सोदाहरण देत कार्यशाळेत सहभागी विध्यार्थ्यांना विशद केले. तसेच डेटा म्हणजे काय?, हॅश म्हणजे काय?, ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय या विविध विषयावर प्रात्याक्षिक देत त्या संदर्भात सखोल माहिती दिली. यानंतर दुपारच्या सत्रात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, कर्नाटक येथील डॉ. भावना रुद्रा यांनी रिसेंट इनोव्हेशन इन ब्लॉक चेन टेक्नोलॉजी अॅन्ड सायबर सेक्युरिटी, ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञ, अश्या विविध विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यानंतर वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी चेन्नई कैम्पसचे डॉ. माहेश्वरी, डॉ. फार्दास बरभुइया, आयआयटी पटना येथील डॉ. राजू हालडर, डॉ. एस. के. सुबिध अली, डॉ. सौरव कांती अब्दुला, थाकुर कॉलेज ऑफ इंजिनिअरीग मुंबई येथील डॉ. कमल शहा, डॉ. बोधीसत्व मुझुमदार यांनी उर्वरित दिनी कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व प्रा. प्रमोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. निलेश इंगळे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. तुषार वाघ, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. पूजा नवाल, प्रा. योगिता धांडे, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. रश्मी झांबरे यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.