बहाळ शिवारातून ३४ बकऱ्या व १ बोकड चोरले !

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील बहाल शिवारातून गोठ्यात बांधलेल्या ३४ बकऱ्या व १ बोकड असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांच्या पशुधनाची चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , बहाल येथील विजय परशुराम महाजन वय ३५ हे शेतकरी असून त्यांच्या बहाल शिवारातील शेत गट क्रमांक १०७६ येथे पाटाच्या चारीजवळ असणाऱ्या शेतामधीं पत्री शेडमध्ये अज्ञात आरोपी यांनी दि.१५ रोजीचे ११ ते दि.१६. रोजीचे सकाळी ६ वाजेचे दरम्यान पत्री शेड मधुन ३,६०,००० की च्या ३४ बकऱ्या व १ बोकड एकुण ३५ बक- या गावराण, शिरोही, काठेवाड, जातीच्या तसेच लाल,पाढ-या रंगाच्या, काळ्या तपकीरी रंगाच्या लहान व मोठ्या बक-या असे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या म्हणुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास तपासी पोउपनिरीक रोहीदास माळी करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.