तामिळनाडू: फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 9 जणांचा मृत्यू

0

 

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अग्निशमन आणि बचाव विभागाने सांगितले की, विरुधुनगर जिल्ह्यातील कम्मापट्टी गावाजवळील फटाके बनवणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (१७, ऑक्टोंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याचे झाला.

स्फोटानंतर जागीच चार जणांचा मृत्यू झाला होता. इतर जखमींना दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान, आणखी पाच जण दगावले. घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली आहे.या घटनेनंतर कारखान्याचे मालक राजेंद्र (65) आणि त्यांचा जावई अरुण कुमार (39) यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेवेळी कारखान्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्रनने फटाक्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम करणाऱ्या आणखी ३० कामगारांना कामावर ठेवले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.