शांघाय ;– कोरोनामुळे जगात सर्वत्र थैमान घातलेले असताना आता जगाची पुन्हा चीनने झोप उडविली असून लहान मुलांमध्ये रहस्यमय व्हायरस आढळून आल्याने चीनमध्ये सर्व शाळांना सुटी देण्याचा विचार सरकार करीत आहे.
कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे.
आजाराची लक्षणे
चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता कुठे कोरोनाच्या धक्क्यातून सावरु लागली आहे. असं असतानाच आता कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होती तशी परिस्थिती निर्माण होणार की काय अशी भीती पुन्हा चिनी लोकांच्या मनात डोकवू लागली आहे. खरं तर चीनमध्ये वेगाने पसरत असलेला हा संसर्ग निमोनियासारखा आहे. मात्र या आजाराची लक्षणं निमोनियासारखी नाहीत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. संसर्ग झाल्यानंतर मुलं तापाने फणफणू लागतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.