डोक्यात सळई पडून ९ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी सळई पडून तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुद्र केतन राऊत (रा. वीरभद्र नगर बाणेर) असे या मुलाचे नाव असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसलळा आहे. दरम्यान या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून, हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर येथील गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरु आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास या इमारतीच्या पहाडाचे काम सुरु होते. याच दरम्यान रुद्र राऊत हा ९ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी जात होता. रुद्र या इमारतीच्या खाली आला असतांना इमारतीवरून लोखंडी सळई त्याच्या डोक्यात पडली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने ज्युपिटर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अवघ्या ९ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी मृ्त्यू झाल्यामुळे सदर कुंटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून संबंधित बांधकाम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.