वर्ग सुरु असतांना विद्यार्थी खेळत असल्याने दिली उठबशा काढण्याची शिक्षा ; विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

जाजपूर ;- विद्यार्थी वर्गात क्लास सुरु असताना बाहेर खेळत असल्याचे पाहून शिक्षकाने त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात घडली आहे. रुद्र नारायण सेठीअसे या विद्यार्थ्याचे नाव असून तो ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना क्लास बंक केल्याची शिक्षा म्हणून उठा-बशा काढण्याचे आदेश दिले. याच दरम्यान रुद्र नावाचा मुलगा जमिनीवर पडला. रसूलपूर ब्लॉकजवळील ओरली गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी आणि शिक्षकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं.

आरोग्य केंद्रातून, रुद्रला मंगळवारी रात्री कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रसूलपूर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर निलांबर मिश्रा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. “आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही तपास सुरू करू आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक कारवाई करू” असं मिश्रा यांनी म्हटलं आहे.

कुआखिया पोलीस स्टेशनचे आयआयसी श्रीकांत बारिक यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. मुलाच्या वडिलांनी किंवा शाळेने एफआयआर दाखल केलेला नाही. रसूलपूरचे सहाय्यक गटशिक्षण अधिकारी प्रवंजन पती यांनी शाळेला भेट दिली असून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.