लोकशाही न्यूज नेटवर्क
आयपीएल २०२४ ला लवकरच सुरुवात होणार असून, या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी खेळाडूंची ट्रेंडिंग प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे.
सूत्रांनुसार, मुंबई इंडिअन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा गुजरात टायटन्स मध्ये जाऊ शकतो. रोहितऐवजी आपल्याच संघातील माजी खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री होऊ शकते.जर हा ट्रेड यशस्वी झाला तर आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.
मात्र माध्यमातील वृत्तात असंही म्हंटल जात आहे की, जोफ्रा आर्चरला हार्दिक पंड्यासोबत ट्रेड केलं जाऊ शकत. असं झाल्यास जोफ्रा आर्चर मुंबई नव्हे तर, गुजरात टायटन्स संघाकडून खेळतांना दिसून येईल. तर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतांना दिसून येईल.